१५ दिवसात नवीन वाशिष्ठी पुलाचे काम चालू करा नाही तर पाठीला तेल लावून या
शौकत मुकादम यांचा अधिकाऱ्यांना इशारा
ओंकार रेळेकर-चिपळूण
वाशिष्ठी पुलाचे काम सुरु झाल्यानंतर कंपनीच्या गोंधळामुळे गेली दोन वर्ष पुलाचे काम बंद आहे.अनेक वेळा बैठका,चर्चा झाल्या.संबंधित कंपनीचे अधिकारी लोकप्रतिनिधींजवळ व कार्यकर्त्यांजवळ कायम खोटी माहिती देत असतात व प्रत्येक वेळेला बैठकीच्या वेळी कंपनीचे अधिकारी बदलत असतात. त्यांनी काय सांगितले मला माहित नाही.पुढच्या वेळी मी काय सांगितले मला माहित नाही असे दोन वर्ष आम्हाला झुलवत आहेत,अशा शब्दांत माजी सभापती शौकत मुकादम यांनी संताप व्यक्त करत १५ दिवसात नवीन वाशिष्ठी पुलाचे काम चालू करा नाही तर चर्चेला येताना पाठीला तेल लावून या असा इशारा त्यांनी दिला आहे.सध्याच्या कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी नवीन पुलावर येऊन जानेवारी अखेरपर्यंत दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करु असे सांगितले आहे व दोन वर्षात पूर्ण हायवेचे काम पूर्ण करु असे लिहून देतो असे कंपनीच्यावतीने साईट व्हीजीटवर शौकत मुकादम यांच्यासह पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.तर ते पुढे म्हणाले की,या नवीन पुलाचे अर्धवट काम बंद पडल्यामुळे त्यांचे लोखंड पूर्णपणे गंजले आहे.याला गंज प्रतिविरोधक अँन्टी कॅरोसिन ट्रिटमेंन्ट करणे गरजेचे आहे.तसेच कळंबस्ते येथे मुकादम सॉमिलजवळ धामणंद पंधरागावाकडे जाणारा हायवे खालचा अंडरपास हा ७ मीटरचा उंचीला होणे गरजेचे आहे.५ मीटरचा चालणार नाही असे यावेळी मुकादम यांनी सांगितले.