खेड तालुक्यातील दाभीळ जांभूळवाडी येथील युवकांचा मनसेत जाहीर प्रवेश
ओंकार रेळेकर-चिपळूण
खेड तालुक्यातील दाभीळ जांभूळवाडी येथील युवकांनी राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या युवकांचे मनसेत स्वागत केले. मनसेचे तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांच्या मार्गदर्शनाखाली या युवकांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. आज प्रवेश करणाऱ्या युवकांमध्ये दिपेश पाङावे, श्रीपाद गजमल, अंगराज भिगारे, संदेश पाङावे, अभिषेक सकपाल, रोहित गजमल, किरण पाचणेकर, नितीन धाङवे, निलेश धाङवे, विनोद शिंदे, सागर गजमल, समीर गजमल, अमोल पाणकर, संतोष गजमल शुभम गजमल, संदेश पाचनेकर, कल्पेश वायगणकर, प्रकाश महाङीक, प्रशांत पाङावे, गणेश गजमल यांचा समावेश आहे.