अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस आयुक्त
तरोनिश मेहता
महाराष्ट्र मिरर टीम पुणे
पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली होणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून अधिकारी वर्गामध्ये पाहण्यास मिळाली. मात्र आजअखेर डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली, विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता पुणे शहराच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून ते 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.