कोरोना संदर्भात आमदार योगेश कदम यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा
ओंकार रेळेकर-चिपळूण
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. परंतु या रुग्णांना योग्य उपचार मिळावे व हे संक्रमण टाळता यावे यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहेत. याच पार्श्वभूमीवर दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
आमदार कदम यांनी तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ शीर्षे तालुका आरोग्य अधिकारी डॉ भावटणकर तहसीलदार वेंगुर्लेकर व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांना रुग्णांच्या सुविधा आणि उपचारांबाबत सूचना देखील केल्या. तसेच येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, औषध व सर्व आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. तसेच त्यांना कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाण्याची गरज भासली नाही पाहिजे, अशा शब्दात ताकीदही उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. याठिकाणी आवश्यक त्या यंत्रसामग्री, बेड्स, व औषधी उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले. जनरल फिजिशियन व आवश्यक स्टाफ देण्याबाबत देखील जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना दिल्या.
मंडणगड ग्रामीण रुग्णालय येथे अतीगंभीर रुग्णांवर तात्काळ उपचार केले जावेत यासाठी या रुग्णालयात भविष्यात २० बेड्सचा आयसीयु वॉर्ड देखील सुरू करण्यात येईल तसेच याठिकाणी व्हेंटिलेटर देखील उपलब्ध लवकरच करण्यात येईल असे आमदार योगेश दादा कदम यांनी सांगितले.
तसेच नजीकच्या भागात कोरोना केअर सेंटर मध्ये असणाऱ्या बेड्सची संख्या वाढविल्या जात आहेत.
रुग्णांना या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्यास किंवा उपचारांमध्ये कोणत्याही समस्या निर्माण होत असल्यास नागरिकांनी थेट मला संपर्क करावा मी त्यांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असेल, असे आवाहनही आमदार कदम यांनी केले आहे.
सदर ग्रामीण रुग्णालयात शिवसेना माजी जिल्हा प्रमुख श्री शशिकांत चव्हाण मंडणगड तालुका प्रमुख श्री प्रतापजी घोसाळकर संघटक अनंतजी लाखन सभापती सौ प्रणाली ताई चिले शिवसेना विभागप्रमुख दीपक मालुसरे राजेश भवने उपविभागप्रमुख कलंदर मुंगुरुस्कर शिवसेना शहप्रमुख विनोद जाधव ग्राहक तालुका प्रमुख सुजित देवकर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.