साताऱ्यात पुन्हा खुनाची घटना,जिल्हा हादरला.
मिलिंद लोहार-सातारा
जावळी तालुक्यातील मार्ली घाटात चौघांच्या खुनाची घटना ताजी असताना साताऱ्यात विलासपुर हद्दीत शिवराज पेट्रोल पंपाच्या जवळ एका पस्तीस वर्षीय युवकात युवकाच्या डोक्यात दगड
घालून खून झाल्याची घटना झाली असल्याचे समजते.
मार्ली घाटात चौघांचा खून प्रकरण ताजे असतानाच सातारा येथील विलासपूर हद्दीत पुणे बेंगलोर हायवे वर आणखीन एक पस्तीस वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे.
जावली तालुक्यातील मार्ली येथील खून प्रकरण व आज विलासपुर हद्दीतील खून प्रकरण या दोन्ही प्रकरणांमध्ये नक्की काय समोर येते व कितीही भयावह असेल याची कल्पना करवत नाही हा कोणी सिरीयल किलर तर नाही एकामागोमाग एक खून होणे त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हात खळबळ उडाली आहे