Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

 वृत्त क्रमांक :-1232                                            दिनांक :- 21 सप्टेंबर, 2020


शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

      महाराष्ट्र मिरर टीम-अलिबाग



  जिल्ह्यामध्ये सर्व खाजगी व शासकीय कोविड-19 रुग्णालयांमध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेड व आय.सी.यू. बेडबाबत सनियंत्रण करण्यासाठी तहसिलदार कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

          त्यानुसार रायगड जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड O2 व आय.सी.यू. बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती उपलब्ध होवू शकेल.

         

तहसिल कार्यालय, अलिबाग-02141-222054, तहसिल कार्यालय, पेण-02143-252036, तहसिल कार्यालय, मुरुड-02144-274026, तहसिल कार्यालय, पनवेल-022-27452329, तहसिल कार्यालय, उरण-022-27222352, तहसिल कार्यालय, कर्जत-02148-222037, तहसिल कार्यालय, खालापूर-02192-275048, तहसिल कार्यालय, माणगाव-02140-262632, तहसिल कार्यालय, तळा-7066069317, तहसिल कार्यालय, रोहा-02194-232232, तहसिल कार्यालय, पाली-02142-242665, तहसिल कार्यालय, श्रीवर्धन-7249579158, तहसिल कार्यालय, म्हसळा-02149-232224, तहसिल कार्यालय, महाड-02145-222142, तहसिल कार्यालय, पोलादपूर-02191-240026, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-02141-222118

        तरी गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies