सिव्हीलमधील मृत अर्भक प्रकरणी महिलेवर गुन्हा
महाराष्ट्र मिररने केलेला पाठपुरावा
कुलदीप मोहिते /मिलिंद लोहार-सातारा
महाराष्ट्र मिरर ने केलेल्या पाठपुरव्यानंतर शल्यचिकित्सक अमोद गाडीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती आणि चौकशी समिती नेमण्यात आली होती
सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या ड्रेनजची स्वच्छता करत असताना दीड महिन्यापूर्वी टॉयलेटमध्ये स्वच्छता कामगारांना स्त्री जातीचे मानवी भ्रूण मृतावस्थेत सापडले होते
या प्रकरणी महाराष्ट्र मिररने आवाज उठवला होता तो संपूर्ण सातारा जिल्ह्याने बघितला होता मात्र आमोद गाडीकर यांच्या तडकाफडकी बदलीने हे प्रकरण शांत झाल्यासारखे वाटले परंतु संपूर्ण सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती मात्र शनिवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधीत महिला व गर्भलिंग करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
स्वच्छता कामगाराने काढलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता मात्र त्या सफाई कामगाराला कामावरून काढण्यात आले यावेळी सिव्हिल मध्ये नक्की चाललेय काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आला. याप्रकरणामुळे तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ.आमोद गाडीकर यांच्यावर आरोपही झाले
सर्व स्तरातील लोकांनी डॉ.आमोद गाडीकर यांच्यावर कारवाईची मागणी केली. समाजाला असल्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई व्हावी असे संतप्त पडसाद सातारा जिल्ह्यात उमटत होते.
महाराष्ट्र मिररने त्यावेळेस अतिशय कठोरपणे साताऱ्याच्या जनतेसमोर सिव्हिलचे प्रकरण मांडले आणि त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.
कोरेगाव रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. युवराज करपे यांनी गर्भलिंग करणारा अज्ञात व्यक्ती व संबंधित महिला अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेला पहिल्या तीन मुली असून प्रत्येक सोनोग्राफी करताना पहिल्या दोन मुली असल्याची खोटी माहिती दिली .त्यानंतर 27 जुलै रोजी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये वार्ड क्रमांक 7 मध्ये रक्तस्त्रावाचा त्रास झाल्याने ऍडमिट करण्यात आले होते त्या शौचास गेल्या असताना त्यांना गर्भपात झाला त्यांनी अज्ञात व्यक्तिमार्फत गर्भलिंग निदान करून गर्भपात करून मुल जन्मास येण्यास प्रतिबंध केला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे
गर्भलिंग करणार्यांवर कारवाईच्या मागणीचा जोर
संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असतानादेखील अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान केले जात आहे मात्र आता या प्रकरणामुळे चाचणी करणारे घाबरले आहेत तसेच डॉक्टरांचे ही धाबे दणाणले आहेत
तसेच या प्रकरणी अजून कोण कोण पोलिसांच्या हिट लिस्टवर येणार तसेच चाचणी करणारे देखील यातून सुटू नयेत अशी मागणी होत आहे