मी शिक्षक ..... शिक्षक माझे कुटुंब!!
कुलदीप मोहिते-कराड
प्रेरणादायी
सध्या कराडमध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कराड हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे त्यामुळे बर्याच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत तसेच ऑक्सीजन मशीन अभावी बरेच रुग्ण दगावत आहेत अशा परिस्थितीमध्ये कराड मधल्या सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविंड निधी उभा केला आहे या निधीतून त्यांनी मी शिक्षक शिक्षक माझे कुटुंब अशी योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत त्यांनी तीन ऑक्सीजन मशीन उपलब्ध केल्या आहेत अशी माहिती सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे व तालुका अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी दिली आहे
कोरोना संकटाच्या परिस्थितीत माध्यमिक शिक्षकाच्या घरातील कुणाला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्यास तत्पर ऑक्सिजन मिळावा या उद्देशाने जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी कराड तालुका माध्यमिक कोवीड योध्दा ग्रुप तयार करुन त्याद्वारे तालुक्यातील सर्व माध्यमाच्या माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना निधी संकलित करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातून निधी संकलन झाल्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याचे नलवडे यांनी सांगितले.
या मशिनची सेवा तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या घरच्या रूग्णांना मिळेल, देणगीदारांना प्राधान्य राहील.डॉक्टरांचे शिफारस पत्र अनिवार्य आहे. हे मशिन हवे असल्यास रूग्ण किंवा नातेवाईकांच्या आधारकार्डची झेरॉक्स देणे गरजेचे आहे. मशिनसाठी कराड उत्तरसाठी एस. व्ही. चव्हाण (यशवंतनगर), सुधाकर चव्हाण (बनवडी), कराड शहरसाठी इम्राण मुल्ला (शाहीन हायस्कूल, कराड), सचिन नलवडे, तर कराड दक्षिणसाठी राहूल मोहिते, मनोज जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.