Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

म्हसळयात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजनेचा आरोग्य विभागाच्या अनुपस्थित शुभारंभ

 म्हसळयात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजनेचा आरोग्य विभागाच्या अनुपस्थित शुभारंभ


 अरुण जंगम-

महाराष्ट्र मिरर टीम म्हसळा



गेली सात महिने कोरोनाने जगभर  थैमान घातले आहे.कोरोनावर उपचारासाठी ठोसपणे अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही त्यामुळे कोरोना कधी संपेल याची चिन्हे फारच कमी असल्याने महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेला सुरुवात केली आहे या मोहिमेचा शुभारंभ म्हसळा तहसिल,पंचायत समिती आणि नगर पंचायत यांचे वतीने करण्यात आला.ज्यांच्या हाती जनतेचे आरोग्य सुरक्षित आहे तेच तालुका वैद्यकीय विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेत शासनाचे नेमुन दिलेले संबंधीत 5 अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन ट्रेस,ट्रॅक,ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी माहिती व तपासणी करणार आहेत.मुंबई, पुणे,ठाणे इत्यादी शहरात कोरोना आजारांचे रुग्ण संख्या तुलनेने स्थिर होत असली तरी इतर जिल्हे आणि ग्रामीण भागामध्ये कोविड-19 रुग्ण मोठया प्रमाणात आढळुन येत आहेत या बाबत माहिती देताना अनलॉक प्रक्रिया सुरू असताना,जनजीवन  पुर्वपदावर आणण्याबरोबरच कोविड प्रादुर्भावावर नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा घर भेट देऊन आरोग्य, शिक्षण,महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह,हृदयविकार,किडनी आजार,लठ्ठपणा या सारख्या महत्वाच्या co-morbid condition असणाऱ्या व्यक्ती शोधुन काढणे,त्याच प्रमाणे बालकांचे लसीकरण, गरोदर मातांवर वेळीच उपचार याचा अंतर्गभाव या मोहिमेत आहे.म्हसळा तालुक्यात माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि त्या बाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी तहसीलदार शरद गोसावी,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,मुख्याधिकारी  मनोज उकिर्डे यांनी न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा येथे संयुक्तिक वार्तालाप घेऊन मोहिमेचा शुभारंभ करून पत्रकारांना माहिती दिली.या वेळी कार्यक्रमाला राजीप कृषी सभापती बबन मनवे,सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर,नगराध्यक्षा जयश्री कापरे,माजी सभापती छाया म्हात्रे,प.स.सदस्य संदीप चाचले,स.तहसीलदार सोनवणे,गट शिक्षण अधिकारी संतोष शेटगे,विस्तार अधिकारी गायकवाड,स्कूल चेअरमन समीर बनकर,अनिल बसवत आदी मान्यवर आणि स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.सदरची मोहीम दिनांक 15 -09-2020 ते 25-10-2020 या कालावधीत दोन टप्प्यात राबवली जाणार आहे.अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी कार्यक्रमात माहिती देताना तपासणी करणारे पथक रोज 50 कुटुंबाला गृहभेटी देतील.या भेटीत तपासणी आणि कोमाँर्बीड,आजारी व्यक्तिंना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वावरे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी संपुर्ण राज्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.


जनतेच्या आरोग्यासाठी तपासणी करणारेच कार्यक्रमाला गैरहजर


ज्यांच्याकडे जनतेच्या आरोग्याची,उपचारासाठी शासनाने दोरी दिली आहे ते म्हसळा आरोग्य विभागाचे डॉ कांबळे त्यांचे संबंधित अधिकारी यांची माझे कुटुंब-माझी जबाबदारी या कार्यक्रमात उपस्थिती नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies