शिवसेना म्हणजे धगधगते अग्नीकुंड
शिवसेनेच्या नादाला लागाल तर संपून जाल
प्रमोद जठार यांना शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा इशारा
ओंकार रेळेकर-चिपळूण
शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी निर्माण केलेले एक अस्त्र आहे़. शिवसेना म्हणजे एक धगधगते अग्नीकुंड आहे़. ज्यांनी आतापर्यंत शिवसेना संपवण्याची भाषा केली तेच संपून गेले आहेत़. त्यामुळे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि राज्य सचिव प्रमोद जठार यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे़. शिवसेनेच्या नादाला लागाल तर तुम्हीच संपून जाल असे चोख प्रत्युत्तर शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक यांनी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि राज्य सचिव प्रमोद जठार यांना दिले आहे़.
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी शिवसेना संपेल़. शिवसेना सत्तेतून उतरेल़. त्याच्या दुसर्या दिवशी नाणार रिफायनरीची अधिसूचना काढली जाईल असे वक्तव्य केले आहे़. या वक्तव्याचा जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांनी खरपूस समाचार घेतला़. महाडीक म्हणाले की, कोकणात अनेक समस्या असताना प्रमोद जठारांना फक्त रिफायनरीच दिसते आणि ही रिफायनरी केव्हाच रदद झालेली आहे़. त्यामुळे रिफायनरीचे स्वप्न प्रमोद जठारांनी पाहू नये आणि शिवसेना सत्ततून उतरेल या भ्रमात राहू नये़. शिवसेनेवर टीका करण्याआधी प्रमोद जठार यांनी आपण शिवसेनेमुळेच युतीचा आमदार म्हणून निवडून आला होतात़. त्यानंतर मात्र तुम्हाला पराभव स्विकारावा लागला़ याची जाणीव त्यांनी ठेवावी़ शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपून गेले आहेत हे इतिहास सांगतो़ त्यामुळे शिवसेनेच्या नादाला तुम्ही लागाल तर तुम्हीच संपून जाल़. शिवसेना ही मराठी माणसाची अस्मिता आहे असे चोख उत्तर महाडीक यांनी दिले़. पुढे महाडीक यांनी जठारांना आणखी एक आठवण करुन दिली आहे़. 2014 ते 2019 मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होता़. केंद्रात तर तुमचेच सरकार आहे़, मग तुम्ही रिफायनरीची एक वीटपण का लावू शकला नाहीत़. शिवसेना आणि ग्रामस्थांमुळेच हा रिफायनरी प्रकल्प रदद करावा लागला होता़. त्या दिवसापासून प्रमोद जठार हे रिफायनरीची स्वप्ने पहात असल्याची टीका महाडीक यांनी केली़