ज्येष्ठ भाजी व्यावसायिक सुधीर शिंदे यांचे कार्य तरुणांना आदर्शवत - आमदार शेखर निकम
नगरसेवक सुधीर शिंदे यांनी सुरू केलेल्या भाजी मंडईला आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट
ओंकार रेळेकर-चिपळूण
शहरातील बायपास रोड येथे पांडव लेणी समोर ज्येष्ठ भाजी व्यावसायिक आणि महर्षी आण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे अध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांनी सुरू केलेल्या भाजी मंडईला शहरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या भाजी मंडईला आज शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी आमदार शेखर निकम यांनी सदिच्छा भेट दिली.त्यांचे नगरसेवक सुधीरशेठ शिंदे, भूषण शिंदे यांनी यथोचित स्वागत केले.यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी,मनोज जाधव,खालिद दाभोळकर, समीर काझी आदीं उपस्थित होते.
याठिकाणी नागरिकांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद आणि स्वस्त - मस्त भाजी पाहून ज्येष्ठ नगरसेवक सुधीरशेठ शिंदे यांची प्रशंसा करताना आपले कार्य तरुणांना लाजवेल असेच असून या कार्याचा आदर्श तरुणांनी घेण्यासारखा आहे.भाजी व्यवसायातील आपला प्रदीर्घ अनुभव पाहता चिपळूण शहरातील नागरिकांना आरोग्यदायी आणि स्वस्त मस्त भाजी देण्याचे मोलाचे काम आपण करत आहात असे देखील आमदार निकम यावेळी म्हणाले.