निमणीत आरोग्य तपासणी
सुधीर पाटील -सांगली
निमणी येथे ' माझे कुटुंब .. माझी जबाबदारी ' या शासनाच्या मोहिमे अंतर्गत प्रत्येक घरी जावून सर्वांची ऑक्सिमिटर व इन्फ्रारेड थर्मामीटर गनने तपासणी सूरू केली असून निमणीचे सरपंच विजय पाटील हे स्वता या मोहिमेत पूर्ण गांव हेच माझे कुटुंब या भावनेने सहभागी होवून आशा ताईना मदत व मार्गदर्शन करीत आहेत. तसेच सर्वांना सहकार्याचे आवाहन करीत व धीर देत आहेत.नुकतेच त्यांच्या विशेष प्रयत्नातून कण्हेरी मठातील इम्युनिटी बूस्टर(रोगप्रतिकारक शक्तीवर्धक) औषधाचे वाटपही गावातील जवळजवळ सर्व कुटुंबांना वितरीत केले असून चुकून राहिलेल्या कुटुंबांनाही ते लवकरच दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे हे औषध सांगली जिल्ह्यात प्रथम निमणीत उपलब्ध झाले होते. त्याआधी मुलगा ओंकारच्या वाढदिवसानिमित्त अर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक शक्ती वर्धक गोळ्यांचे मोफत वाटपही घरोघरी झाले आहे.या सर्व कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत.यासाठी त्यांना पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामस्तरीय समिती सदस्य,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा स्टाफ या सर्वांची बहुमोल साथ लाभत आहे.