अमेरिकेत पायलट होऊन महंम्मद खोत याने केले पोसरे गावचे नाव उज्ज्वल : नासिर खोत
वयाच्या २१ व्या वर्षी महंम्मदचे दैदिप्यमान यश
ओंकार रेळेकर-चिपळूण
अमेरिकेत पायलट होऊन महंमद युसूफ असिफ खोत याने पोसरे गावचे नाव उंचावले आहे,त्याने वयाच्या २१ व्या वर्षी शिक्षणात नेत्रदीपक कामगिरी केली आहे .अशी प्रतिक्रिया चिपळूण मधील प्रतिष्ठित उद्योजक नासिरभाई खोत यांनी येथे बोलतांना व्यक्त केली,
पोसरे गावचे सुपुत्र असलेले आखाती देशातील दोहा कतार येथील उद्योजक आसिफ युसूफ खोत यांचे चिरंजीव महंमद युसूफ असिफ खोत याला लहान पणापासून वैमानिक होण्याची प्रचंड ईच्छा होती,या कामी त्याला शिक्षणात त्याचे काका चिपळूण मधील उद्योजक फैसल खोत,नासिर खोत यांचे सतत प्रोत्साहन असायचे,आपल्या मुलाची ही आकांशा साकार होण्यासाठी आसिफ खोत यांनी महंमद चे कतार मधील शालेय शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुढे संपूर्ण जगात पायलट होण्याचे शिक्षणाकरिता प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील ग्लोबल अकॅडमी एवियेशन या मोठ्या शिक्षण संस्थेत महंमद याला प्रवेश घेतला येथे कोकणातील आणि संपूर्ण भारतातील हजारो मुले शिक्षण घेत आहेत,महंमद याने वयाच्या २१ व्या वर्षी पायलट होण्याचा बहुमान मिळविला आहे,
त्याच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल उद्योजक नासिरभाई खोत,उद्योजक फैसलभाई खोत यांनी विशेष अभिनंदन केले आहे,
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी,मित्रपरिवार यांच्याकडून
त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे,
पोसरे गावाला मिळाला पहिला वैमानिक होण्याचा बहुमान .....
पोसरे गावचे सुपूत्र आसिफ यूसूफ खोत यांचे चिरंजीव यूसूफ आसिफ खोत यांनी वैमानिक(पायलट)होण्याचा बहूमान मिळवला आहे.महाराष्ट्राला कोकण च्या मातीने अनेक रत्न दिले. प्रत्येक क्षेत्रात कोकणातील लोकांनी आपले अस्तित्व सिध्द केले आहे. यूसूफ आसीफ खोत यांच्या रूपाने कोकणच्या तसेच पोसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.अमेरिकेतील ग्लोबल
अँकेडमी मधून वयाच्या २१ व्या वर्षी पायलट होण्याचा बहूमान त्याने मिळवला आहे.
पायलट होण्यासाठी शिक्षण घेतांना मला शिक्षणाचे मोठे आवाहन वाटत होते परंतु शिक्षणात आपले लक्ष एकमार्गी केंद्रित केले तर काहीच अशक्य नसते,कुटुंबातील मंडळी आणि माझ्या हौशी गरजा या कढे काही वर्षे लक्ष कमी देण्याचा विचार केला जास्तीत जास्त यात लक्ष दिले ,जिद्द,चिकाटी,मेहनत आणि काहीतरी वेगळे करण्याचा मनाशी निश्चय मी केल्यामुळेच मला वैमानिक होता आले अशी प्रतिक्रिया पोसरे गावाला वैमानिक होण्याचा पहिला बहुमान मिळून देणारा महंमद युसूफ असिफ खोत याने प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलतांना व्यक्त केली, माझे पिता आसिफ खोत,काका फैसल खोत,यांनी शिक्षणात मला सतत प्रोत्साहन दिले कधीच काही कमतरता भासू दिली नाही यामुळेच मला यशोशिखर गाठता आले असे महंमद खोत याने सांगितले
फैसलभाई खोत, आसिफ खोत, कैसर खोत, नासिरभाई खोत, मुबिन खोत, इब्राहिम भाई शेखनाग, सरफराज म्हमतुले, अनवरभाई पोशरकर, शारुख शेखनाक, चांगदेव जाधव, शाहनवाज नांदगावकर, हशम भाई म्हमतुले, मुजफ्फरभाई खान, वैभव खेडेकर आदींनी महंमद खोत यांचे अभिनंदन केले आहे,