जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी नगरपालिका कार्यालसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी
मिलिंद लोहार-पुणे
पुण्यात कोरोना संकट एवढे भयावह असताना देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत परंतु पालिकेने देखील ऑनलाईन दाखले देणे गरजेचे आहे कसबा पेठेजवळ असणाऱ्या या कार्यालयात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दोन दिवसांपूर्वी मुबंईमध्ये संचारबंदी लागू केली तरीही नागरिक काही ठिकाणी एकत्र येत आहेत त्यामुळे संसर्ग वाढत आहे व याचा ताण हॉस्पिटल वर पडत आहे जन्म आणि मृत्यू दाखला व अशा अनेक प्रकारचे दाखले ऑनलाईन व डिजिटल स्वरूपात असे येथील नागरिकांचे म्हणणं आहे.
एका नागरिकांने तर चक्क आपल्या लहान मुलाला खांद्यावर घेतले होते व त्याला मास्क नव्हतं.आपले कुटुंब आपली जबाबदारी.
तरी पुणेकरांनो मास्क वापरा असे आवाहन महाराष्ट्र मिरर करत आहे