साजगाव फाट्यावर एसटी बस आणि कारचा अपघात. ट्रॅफिक वळवली .
महाराष्ट्र मिरर टीम
खोपोली पेण रस्त्यावर साजगाव फाट्यावर कार आणि एसटी बसचा अपघात झाला असून सुदैवाने कोणालाही मार लागला नसल्याचे कळतंय.वाहतूक पोलीस स्पॉटवर पोहचले असून वाहतूक वळवण्यात आली आहे.
क्रेनच्या सहाय्याने लागलीच दोन्ही वाहने सुरक्षित स्थळी हलवून वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती अमोल ठकेकर यांनी दिली आहे.
या अपघातात कोणीही जखमी नाही मात्र वाहनांचे नुकसान झाले असून खोपोली पोलिस अधिक तपास करत आहेत.