रायगड.....
खोपोलीत सहज स्वर्ग रथाचे उदघाटन.....
सहज सेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम,
दत्ता शेडगे-खोपोली
खोपोली नगरपालिका हद्दीतील निधन होणाऱ्या नागरिकांना विविध मार्गाने अंतिम विधिसाठी स्मशान भूमी पर्यंत न्यावे लागते, मात्र आता सहज सेवा संस्थेच्या माध्यमातून मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी आता घरापासून ते स्मशान भूमी पर्यंत नेण्यासाठी निशुल्क सहज स्वर्गरथ उपलब्ध करून दिला आहे.याचे उदघाटन खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या हस्ते पार पडले,मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला.सहज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या माध्यमातून खोपोली हद्दीत विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे, या उपक्रमाचे खोपोली शहरात सर्वत्र कौतुक होत आहे,
यावेळीं माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गणेश शेट्टे,जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,नगरसेवक मंगेश दळवी, किशोर पानसरे,निजामुद्दीन जळगावकर,सहज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शेखर जांभळे,सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,समाजातील अनेक मान्यवर व आदी उपस्थित होते,खोपोलीचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते,