कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात साजरी
महाराष्ट्र मिरररयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी ऑनलाईन सेशनद्वारे विद्यार्थ्यी व प्राध्यापक यांना आण्णाच्या जीवनावर आधारीत माहिती दिली.
कोरोनाच्या काळात कर्मवीरांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाने सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळून कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा, वर्कृत्व स्पर्धा, काव्यवाचन, गीतगायन व छायचित्र स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन केले होते.
महाविद्यालयात सकाळी प्राचार्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्याला हार घालून आजच्या जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर प्राचार्यांनी जयंतीनिमीत्त आयोजीत सर्व स्पर्धांचा ऑनलाईन आढावा घेतला. तसेच कर्मवीरांचे विचार व कार्य यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
"आण्णांनी आपल्या ७२ वर्षांच्या आयुष्यात रयत शिक्षण सारख्या मोठ्या संस्थेची उभारणी केली. यामुळे खऱ्या अर्थाने बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडी झाली. यामुळे महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीची चांगली जडणघडण झाली. 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' असे म्हणत श्रमाच्या बदल्यात गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण उपबलब्ध करुन दिले, " असे यावेळी बोलताना प्राचार्य गायकवाड म्हणाले.
यावेळी मास कम्यनिकेश विभागाचे कोर्स कॉर्डिनेटर डॉ. माधव सरोदे, मास कम्युनिकेश विभाग प्रमुख प्रा. तुषार डुकरे, प्रा. शरद बोदगे, प्रा. आश्विनी सातव, प्रा. रुषीकेश खंबायत, डॉ. बिराजदार, सौ. अर्चना केंगले व श्री धुमाळ उपस्थित होते.