" सवयी बदला व कोरोना टाळा " कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशींचे नागरिकांना आवाहन!!
1) आपण कोणत्याही दुकानात, दवाखान्यात गेल्यावर तेथील कोणत्याही वस्तूला विनाकारण स्पर्श करू नका. आपली कोणतीही वस्तू म्हणजे मोबाईल, चाबी, चष्मा तेथिल टेबल, खुर्ची, फर्निचर वर ठेऊ नका याच्याने कदाचित कोरोना तुमच्या बरोबर घरी येऊ शकतो.
2) विना कारण कोणाच्या गाडीवर बसू नका, किंवा गाडीला म्हणजे आरसा, हॅन्डलला हात लावू नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवा
3) बऱ्याच लोकांना गप्पा मारतांना हाताची टाळी मारणे, खांद्यावर हात ठेवणे अशी सवय असते याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.
4) ऑफिस मध्ये एकाच वेळी जेवायला बसले असाल तर शक्यतो कोणाचाही डब्बा शेअर करू नका. आपला डब्बा आपणच खावा एकाच पाण्याच्या बाटलीने सर्वांनी पाणी पिऊ नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.
5) ऑफिस, बँक मध्ये फॉर्म भरतांना कोणाचाही पेन मागू नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.
6) कोणत्याही परिस्थितीत हात स्वच्छ धुतल्याशिवाय तोंडाला, नाकाला, डोळ्यांना स्पर्श करू नका, तोंड व नाक झाकण्याकरिता मास्क वापरा
7) विना कारण घराबाहेर जाऊ नका. घरात तुंम्ही एकटे नाही आहात तुमच संपूर्ण कुटुंब आहे त्यात सर्व वयो गटाचे व्यक्ती आहेत. प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती वेग वेगळी असते हे पण लक्षात ठेवा.
8) नेहमी आपल्या घरच्या शौचालयाचाच वापर करा , शक्य असेल सार्वजनिक शौचालयाचा वापर करू नका
9) ताजे व पोटभर जेवन , आँवला ज्यूस, लिम्बु पानी , गरम चहा , मासालेयुक्त काढा, ताजी फळे , गरम पानी ई. घेत रहा
10) कोरोना आपल्याला होणारच नाही ह्या भ्रमात राहू नका सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांच तंतोतंत पालन करा.
11) कोविड-१९ हा एक संसर्गजन्य आजार असून तो कोणालाही होऊ शकतो. म्हणून कोणासोबत भेदभाव करू नका. कोणालाही तिरस्काराची वागणूक देऊ नका. कोरोनावीरांना प्रोत्साहन द्या
मीच आहे माझा व माझ्या परिवाराचा आणि समाजाचा रक्षक* माझे कुटुंब माझी जबाबदारी असही त्यांनी पुढे म्हटलं.