राज्यमंत्री बच्चू कडू यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
सुधीर पाटील-सांगली
अपंग ,शेतकरी, कष्टकरी, शोषित .पीडित, वंचित .यांना आपला परमेश्वर मानणारे एक असामान्य असे व्यक्तिमत्व .जनसेवा करणारे महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या हृदयावर अधिराज्य करणारे आपल्या हटके आंदोलनाच्या स्टाईलमुळे उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे अन्यायाविरुद्ध लढणारे अन्यायाविरुद्ध मनामध्ये प्रचंड चीड असणारे प्रशासनावर जरब असणारे चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये ज्यांच्या नावाने धडकी भरते असे व्यक्तिमत्व असणारे मंत्री असताना राहुटी मारून सामान्यांचे प्रश्न सोडवणारे कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये ही अविरतपणे जनसेवेत कार्यरत असणारे आमदार बच्चुभाऊ कडू व त्यांचे कुटुंबीय यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असून संपर्क मध्ये आलेल्या सर्व व्यक्तींनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी अशा पद्धतीचे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे