Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पश्चिम भारतात पहिल्यांदा दोन्ही हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी... परळ येथील ग्लोबल रुग्णालयातून मोनिका मोरेला डिस्चार्ज; करणार नवीन आयुष्याची सुरूवात

 पश्चिम भारतात पहिल्यांदा दोन्ही हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी...

परळ येथील ग्लोबल रुग्णालयातून मोनिका मोरेला डिस्चार्ज; करणार नवीन आयुष्याची सुरूवात

रुस्तम तारापोरवाला
महाराष्ट्र मिरर टीम--मुंबई 

 कुर्ला येथे राहणा-या २४ वर्षीय मोनिका मोरे हिला आज ४ आठवडयानंतर मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. तिच्यावर २८ आँगस्ट रोजी तब्बल १६ तास दोन्ही हातांच्या यशस्वी प्रत्यारोपण आणि खुप चांगली सुधारणा झाली असून ती पुढील नवीन आयुष्यासह सहा वर्षानंतर पुन्हा स्वांवलंबन जीवनाचा प्रयत्न करणार आहे.  

२०१४ मध्ये घाटकोपर येथील रेल्वे अपघातात मोनिकाने तिचे दोन्ही हात गमावले होते. तिने कृत्रित हातांच्या सहाय्याने आपले दैनंदिन आयुष्य जगण्याचा प्रयत्न काही महिने केलाही, पंरतू त्वरीत तिला जाणवू लागले की प्रत्यक्षात निरूपयोगी असून ते एकप्रकारे भारच आहे.   


दोन वर्षांपूर्वी तिने मुंबईच्या ग्लोबल रूग्णालयात दोन्ही हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली. अनेक प्रसंग असे आले की त्यावेळी मोनिकाला अवयव दात्यांकडून हात उपलब्ध होऊ शकले असते मेंदू मृत व्यक्तिच्या कुंटूंबियाकडून हात दान करण्यासाठी कोणी तयार होत नसल्याने ही शस्त्रक्रिया रखडली होती. परंतु, चेन्नईतील ३२ वर्षीय मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानामुळे मोनिकाला नवीन हात मिळाले आहे. चॉर्टड विमानाने हे हात मुंबईत आणण्यात आले होते. रात्री उशीरा या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली होती. साधारणतः १६ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मोनिकाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.


मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, ‘‘हात मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोनिकाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण रखडले होते. पण आता हात मिळाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हातांचे प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात एका वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. तसेच तिची काळजी घेण्यासाठी विलगीकरणासह एका नर्सची नियुक्ती देखरेखीसाठी करण्याची आवश्यकता होती. दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्यात आली. रूग्ण प्रत्यारोपणाच्या तिस-या दिवशी ती आपल्या खांद्याचा आधार घेऊन चालू व बसू लागली. याशिवाय दिवसातून दोनदा तिला फिजिओथेरपी दिली जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी हाताच्या कोपऱ्यापर्यंत प्लास्टर करण्यात आला आहे.”



डॉ.सातभाई पुढे म्हणाले, “येत्या काही आठवड्यांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल. याशिवाय हात आणि बोटांनी ३-४ महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. तिच्या हाताचे स्नायूतील टिश्य आणि हाड तोपर्यत बरे होतील. रूग्णाला या काळात आपल्या दैनंदिन कार्य़ासाठी मदत घ्यावी लागेल. पण, एकदा तिच्या हातांची हालचाल आणि व्यायाम व फिजिओथेरपीव्दारे ती लवकरच अधिक अधिक स्वावलंबी होईल. तिच्या हातांच्या रिकव्हरीसाठी साधारण एक ते दिड वर्ष लागेल. हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला आता चार आठवडे पूर्ण झाले असून मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्या फक्त गोळ्या सुरू आहेत. रूग्ण खुप चांगल्या प्रकारे पुर्ववत होत असून उपचारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे.  हे लक्षात घेऊन मोनिकाला आता घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरी गेल्यावरील तिला दररोज व्यायाम व फिजिथेरपी घेणं गरजेचं आहे.”


हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे मोनिकाला संसर्गाची शक्यता असल्याने कुटुंबियांना तिला भेटायला देता येत नव्हते. अशा स्थितीत कुटुंब तिच्याशी फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते. ”तसेच संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी तिला घरीही काही महिने वेगळे ठेवणे गरजेचे आहे. तसेच, कोरोना काळात पुर्णता काळजी घेत कोणत्याही सामाजिक अथवा गर्दीच्या वेळी बाहेर जाण्यास मनाई आहे. 


रूग्ण मोनिका मोरे म्हणाली, “मला नवीन हात मिळतील ,असा माझा ठाम विश्वास होता. आता माझं स्वप्न पूर्ण झाल्याने मी खूप आनंदी आहे. हात गमावल्याने कोणाच्याही लग्नात मला हाताला मेहंदी लावता येत नव्हती. पण आता मी पुन्हा मेहंदी लावू शकेन. याशिवाय, चित्र काढणे, आंघोळ करणे, स्वयंपाक आणि केस बांधणे ही काम मी स्वतः करु शकेन, याचा मला आनंद आहे. मला मिळालेल्या या नवीन आयुष्यासाठी माझे कुटुंबीय, अवयवदाता आणि डाँक्टरांचे मी आभार मानते. ”


ग्लोबल रुग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विवेक तलौलीकर म्हणाले की, "चेन्नईमधील एका ब्रेनडेड व्यक्तीने हात दान केल्याने मोनिकाला नवीन आयुष्य मिळाले आहे. महाराष्ट्रातील ही पहिली यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मला आशा आहे की ही यशस्वी शस्त्रक्रिया इतर अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रूग्णांना आशा मिळवून देईल आणि विशेषत: अन्य अवयवांसह हात दान करण्यासाठी ही लोक पुढाकार घेतील."


ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई

मुंबईतील परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल ही ग्लेनईगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स इंडियाच्या भौगोलिक अस्तित्वात पडलेली भर आहे. ४५० खाटांची क्षमता असलेले हे हॉस्पिटल १७ मजली आहे. या ठिकाणी अद्ययावत पायाभूत सुविधा आणि आधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय, सर्जिकल आणि निदान सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक एण्डोस्कोपिक शस्त्रक्रिया, हेपॅटोबिलरी (पित्ताशय, आतडे) आणि यकृताच्या शस्त्रक्रिया, सर्जिकल व मेडिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजी, बेरिअॅट्रिक सर्जरी व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया  करण्यात येतात. अस्थिविकार, सांधे प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांसाठी हे हॉस्पिटल सर्वोत्त आहे. या हॉस्पिटलमध्ये २४ तास आपत्कालीन सेवा, क्रिटिकल केअर आणि अपघात उपचार सेवा पुरविण्यात येतात. 

ग्लेनईगल्स ग्लोबल हॉस्पिटल्सची बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईमध्ये मल्टि-सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्स आहेत. आशियामध्ये बहु-अवयव प्रत्यारोपणासाठी या ब्रँडला प्राधान्य देण्यात येते. आएचएच हेल्थकेअर ही ग्लेनईगल्स हॉस्पिटलची मूळ संस्था आहे. आयएचएच हेल्थकेअर हे आघाडीचे प्रीमिअम एकत्रित आरोग्यसेवा पुरवठादार असून त्यांचे ८४ हॉस्पिटल्सचे जाळे आहे आणि १६,००० हून अधिक लायसन्स्ड बेड्स आहेत. मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार करता हा जगातील एक सर्वात मोठा आरोग्य सेवा समूह आहे आणि बुर्सा मलेशियामधील मुख्य मार्केट आणि एसजीएक्स-एसटीचे मुख्य बोर्ड येथे त्यांची नोंदणी आहे. आयएचएच हे मलेशिया, सिंगापूर, तुर्की आणि भारत या मुख्य बाजारपेठांमधील आणि चीन व हाँगकाँग या विकसनशील बाजारपेठांमध्ये आघाडीचे आरोग्यसेवापुरवठादार आहेत.



__

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies