अजित यशवंतराव यांचा वाढदिवसा निमित्त पत्रकांराना स्टिमर वाटप
ओंकार रेळेकर-चिपळूण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस व राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघाचे स्थानिक नेतृत्व मा. अजित यशवंतराव यांचा वाढदिवस कोरोना परिस्थितीमुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.
देशभरात कोरोनाचे संकट असूनही आपले पत्रकार बांधव गेली सहा महिने आपल्या जिवाची काळजी न करता रुग्णांना सुविधा मिळाव्यात. तसेच अरोग्य सेवेतील अडचणी दुर करण्यासाठी वर्तमान पत्रातून जनतेची बाजू मांडत आहेत व अन्याय विरूध्द वाचा फोडण्याचे काम करत आहेत.
त्यासाठी पत्रकांरांच्या अरोग्याच्या काळजी साठी लांजा राष्ट्रवादी युवक काॅग्रेस पार्टीच्या वतीने मराठी पत्रकार परिषद शाखा लांजा व लांजा तालुका पत्रकार संघ लांजा या सर्व पत्रकारांना स्टिमर वाटप करण्यात आले.
त्यावेळी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, युवक प्रदेश सरचिटणीस बंटी वंणजू, महिला तालुकाध्यक्ष स्वप्ना सावंत, जिल्हा सरचिटणीस अभिजित राजेशिर्के, तालुका खजिनदार संजय खानविलकर, सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे, युवक शहर अध्यक्ष बाबा धावणे, मानसी कोपरे, सचिन जाधव, जितेंद्र खानविलकर, दिपक शेट्ये, अनिकेत शेट्ये व इतर कार्यक्रर्ते उपस्थित होते