हेल्प फाउंडेशन व माधवबाग चिपळूण आयोजित मोफत ह्दयरोग व मधुमेह तपासणी शिबीरास भरघोस प्रतिसाद
ओंकार रेळेकर-चिपळूण
जागतिक ह्दयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर हेल्प फौंडेशन व माधवबाग चिपळूणच्या हदयरोग व मधुमेह तपासणी शिबीरास हेल्प फौंडेशनचे अध्यक्ष सतिश कदम यांच्या उपस्थितीमध्ये दि.२२ सप्टेंबर रोजी सुरूवात केली. या शिबिरास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबीरांतर्गत आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती(इम्युनिटी) किती आहे याची खास करुन तपासणी केली जाते. याशिवाय रक्तदाब,तापमान,नाडी परिक्षण, शरीरातील ऑक्सीजन प्रमाण, बॉडी मास इंडेक्स, साखरेचे प्रमाण तपासणी केल्या जात आहेत. या सर्व तपासण्या मोफत असून तज्ञांचे मार्गदर्शनासह एमआयबी पल्स ॲप दिले जात आहे.जर गरज वाटली तर ईसीजी व एचबीए १सी ही चाचणी केल्यास खास सवलतीत करण्यात येत आहे.
जागतिक ह्रदयरोगदिन व महामारीचे संकटात आपल्या निरोगी स्वास्थासाठी हेल्प फोंडेशन संस्थेने माधवबाग चिपळूणच्या सहकार्यातून आयोजन करण्यात आलेल्या या मोफत शिबीराचा लाभ नागरिकांनी जरुर लाभ घ्यावा. असे माधव बागच्या वतीने कळविण्यात आले आहे