सावळज येथे ग्रामपंचायतच्या वतीने गट स्थापन
सुधीर पाटील-सांगली
कोरोनाचा वाढता संसर्ग टाळणेसाठी ' माझे कुटूंब-माझी जबाबदारी' कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने गावातील सर्व शिक्षक ,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवक यांची जि.प.शाळा सावळज येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.
यामध्ये उपस्थित सदस्यांचे गावप्रभागानुसार गट करुन सर्व सदस्यांना सुचना देण्यात आल्या..गावातील सर्व नागरिकांनी आपल्या प्रभागात आलेल्या आरोग्य तपासणी टीमला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच योगेश पाटील यांनी केले.