शिव कामगार सेनेच्या उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड विभागप्रमुखपदी मंगेश ठोंबरे
गणेश मते-भिवपुरी (कर्जत)
शिवसेना पुरस्कृत शिव कामगार सेनेच्या उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड विभागप्रमुखपदी मंगेश ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक नुकतेच प्रदेश कार्याध्यक्ष ऐहतेशाम पेनवाला आणि कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख राजेश कुचिक यांच्याहस्ते देण्यात आले.
कर्जत तालुक्यातील कोषाणे येथील व्यावसायिक मंगेश ठोंबरे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तर, त्यांच्या पत्नी रेश्मा ठोंबरे या उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कार्यरत आहेत. लॉकडाऊन काळातही ठोंबरे यांनी गरजूंना मदत मिळून दिली आहे. नुकतेच शिव कामगार सेनेच्यावतीने उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड विभागप्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून हे पद एक वर्षासाठी असणार आहे. यावेळी जिल्हा कार्यालय प्रमुख समीर मुलानी, तालुका संपर्कप्रमुख उमेश सावंत, तालुका संघटिका मनीषा दळवी, उपतालुका प्रमुख सुभाष पालकर, संदीप बोराडे आदी मान्यवरांसह अंकुश ठोंबरे, गजानन बोराडे, विलास ठोंबरे, दशरथ दाभणे, संतोष ठोंबरे उपस्थित होते.
दरम्यान, उमरोली विभागातील तरुण आणि गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असेल. तसेच, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास स्थानिकांना तेथे प्राधान्य देण्यात यावे यासाठी प्राधान्य आहे. प्रसंगी कोणत्याही कामगारावर अन्याय झाल्यास न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करू, असे मंगेश ठोंबरे यांनी सांगितले.