पत्रकार रविराज पाटील यांचे धक्कादायक दुःखद निधन
महाराष्ट्र मिरर टीम-अलिबाग
कृषीवलचे वृत्तसंपादक पत्रकार रविराज पाटील (36 वर्षे) आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून ते सावरत होते. संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर देखील ते पूर्णपणे बरे झाले नव्हते. त्यामुळे पुढील तपासण्या करण्यासाठी त्यांच्या बंधुराजांच्या सोबत ते अलिबाग मधून पुण्यात सोमवारी गेले. कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्यांचे जुने आजार उफाळून आले. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यावर उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात गेले होते. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर पुण्यात एक्सरे एमआयआरआय केल्यानंतर ते गाडीत बसले असतानाच त्यांना हृदयरोगाचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मावळली!
रविराज पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुलं, भाऊ वहिनी असा मोठा परिवार आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावचे ते मूळ रहिवासी होत.
त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे रात्री 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.