Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्डीग व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून खंडणी उकळणाऱ्या महिला गजाआड

 

अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्डीग व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून खंडणी उकळणाऱ्या महिला गजाआड


प्रतीक मिसाळ-सातारा



 व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ कॉल करुन त्याचे रेकॉर्डिंग करुन ते व्हायरल करण्याची धमकी देत एका डॉक्टराकडून पैसे उकळले जात होते . खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात दोन महिला व एका अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेतले आहे . त्यातील अल्पवयीन तरुणीला घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले असून दोघा महिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . अश्लील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डीग करुन शाहूपुरीतील डॉक्टाराकडून 12 लाखांची खंडणी उकळणाऱ्या तीन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले . खंडणीच्या रकमेतून खरेदी केलेले 12 लाख रुपयांचे सोन्या - चांदीचे दागीने हस्तगत झाले आहेत . फौजदारी कारवाई , मोर्चा काढण्याची व बदनामीची धमकी देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे . शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावून खंडणीची रक्कम नेण्यासाठी आलेल्या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे . प्राची उर्फ श्रद्धा अनिल गायकवाड ( वय 35 वर्षे , रा.सोमवार पेठ , सातारा ) व पूनम संजय पाटील ( वय 35 वर्षे , रा . सोमवार पेठ , मूळ रा . गुजरात कॉलनी कोथरुड , पुणे ) अशी संशयितांची नावे आहेत . त्यांच्या सोबत एक अल्पवयीन तरुणीचाही गुन्ह्यात समावेश आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे , यातील तक्रारदाची या महिलांबरोबर व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती . यातील एका महिलेशी वॉट्सअॅप व्हीडिओ कॉलवर अश्लील चॅटचे या महिलांनी रेकॉर्डीग करुन ठेवले होते . नंतर ते रेकॉर्डीग व्हायरल करुन पोलिसात तक्रार देण्याची , बदनामी करण्याची व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या देऊ लागल्या . त्यापोटी त्यांनी डॉक्टराकडे 60 लाख रुपयांची खंडणी मागितली . 




डॉक्टराने बदनामीच्या भितीपोटी महिलांना 5 ऑगस्टला 12 लाख रुपये रोख दिले . त्यानंतर पैशांसाठी चटावलेल्या या महिलांनी उर्वरीत 48 लाख रुपयांसाठी तगादा लावला . त्यापैकी 20 लाखांची मागणी झाली . आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्याने डॉक्टराने शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली . त्यानंतर पोलिसांनी सापळा लावला . संशयित माहिलांनी फोनवर सरकारी पंचांसमक्ष पैशांची मागणी केली . 20 लाखांपैकी एक लाख रुपयांची तजवीज झाल्याचे सांगितल्याने शुक्रवारी ( दि .25 सप्टें . ) रात्री तिन्ही महिला पैसे घेण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी गेल्या . तक्रारदाराकडून खंडणीची रक्कम स्वीकारल्यानंतर दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी तिघींनाही रंगेहाथ पकडले . दोन महिलांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे . अल्पवयीन युवतीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे . या महिलांनी यापूर्वी उकळलेल्या खंडणीच्या 12 लाख 5 हजार रुपयांतून सोन्या - चांदीची दागिने खरेदी केले होते . दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत . अटकेतील संशयितांना 29 सप्टेंबरपर्यंत पोली कोठडीत रवानगी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies