सकल मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले येथे महा मोर्चा
प्रतीक मिसाळ-कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगली कोल्हापूर हायवेवरती ठिय्या आंदोलन व महामोर्चा काढून सरकार चा निषेध व्यक्त केला.
हे आदोंलन हातणंगले तालुक्यातील व आसपासच्या गावातील मराठा समाजाच्या वतिने करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे अन्याय झाल्याची भावना समाजात आहे. ही स्थगिती तत्काळ उठवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, एकही मराठा तरुण शिक्षणाशिवाय किंवा नोकरीशिवाय राहता कामा नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
स्थगिती उठेपर्यंत राज्य सरकारने पोलिसांची व अन्य नोकरभरती करू नये, अशी नोकरभरती आम्ही होऊ देणार नाही. आम्ही आज शांततेत आंदोलन केले आहे, मात्र मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यास केवळ सरकारच जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष यांनी दिला.
यावेळी सकल मराठा समाज तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, नगरसेवक राजु इंगवले (सरकार) ,सुभाष चव्हाण, भाऊसाहेब फ़ासके, विजय निंबाळकर, कृष्णा चव्हाण, उमेश सूर्यवंशी ,मनोज इंगवले, विजय जाधव, अँड.विजयसिंह निंबाळकर (सरकार), पंडित निंबाळकर, दीपक कुन्नुरे, सागर मोरे , सुजित शेख तसेच इतर सकल मराठा समाजाचे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.