Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माथेरानच्या गॅस टेम्पोसाठी मुदत वाढ मिळावी ,माथेरानकरांची मागणी

 माथेरानच्या गॅस टेम्पोसाठी मुदत वाढ मिळावी ,माथेरानकरांची मागणी

               चंद्रकांत सुतार--माथेरान

 लॉकडाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माथेरानच्या नागरिकांना जीवनाश्यक करून वस्तू मूळ किंमतीत मिळाव्या यासाठी माजी आमदार सुरेश लाड व माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात मालवाहतुकी साठी टेम्पोला परवानगी द्यावी या साठी याचिका दाखल केली होती हायकोर्टाने मानवतेच्या दृष्टीने दि 30 सप्टेंबर पर्यंत टेम्पोला मुदत दिली होती कोर्टाने मोनिटरिंग कमिटीला दि 15 सप्टेंबर रोजी टेम्पो वाहतुक नागरिकांना किती फायदेशीर ठरते या बाबत अहवाल कोर्टात सादर करण्यास सांगितले होते . नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी उत्तम नियंत्रण ठेवल्याने टेम्पोचा गैरवापर होऊ शकला नाही. 

    


 गॅस टाकी रहिवाशांना मूळ किमतीत मिळाल्याने रु 100 ते 150 पर्यंतची बचत झाली  नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी त्यावेळी सांगितल्या प्रमाणे  नगरपालिकेकडून अतिरिक्त वाहतूक खर्च रु 35 एका टाकीमागे दिल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला. 

     टेम्पोसाठी दोन वर्षे मुदत वाढ मिळावी यासाठी अँड.गौरव पारकर कोर्टात अर्ज दाखल करणार आहेत लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी कोरोनाचा परिस्थिती गंभीर झाली आहे केंद्रीय पर्यावरण खात्याने गॅस वाहतुकीसाठी ई -टेम्पोचा वापर करण्याची सुचना केली आहे मात्र यासाठी क्ले पेव्हर ब्लॉकचा रोड होणे आवश्यक आहे एमएमआरडीए ठेकेदाराने ई टेम्पोचा प्रयोग करून पाहिला परंतु चढणीवर चढत नाही त्यामुळेच रस्ता होणे आवश्यक आहे. 

     घोड्यांवरून गॅस टाकी वाहतुकीस प्राणी मित्र संघटनांचा विरोध आहे गॅससारखे ज्वलनशील पदार्थ घोड्यांवरून वाहतूक बेकायदेशीर असल्याचे कुंजू सुब्रमण्यम यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे 



    अजय सावंत व सुनिल शिंदे यांनी सनियंत्रण समितीला पत्र लिहून टेम्पोला दोन वर्षाच्या  मुदतवाढीसाठी  हायकोर्टास शिफारस करण्याची मागणी केली आहे माथेरानचे विविध राजकीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व मनसेने तसेच महिलांच्या तर्फे माथेरान महिला समाजाने पत्र देऊन टेम्पोला मुदत वाढ मिळावी यासाठी मागणी केली आहे.आता माथेरानच्या गॅस टेम्पोचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या हाती , सनियंत्रण समितीची शिफारस महत्वाची आहे, दि 30 सप्टेंबर रोजी मुदत संपत आहे 

 मुदत वाढी साठी कोर्टात अर्ज दाखल केल्यावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्व माथेरानकरांचे लक्ष लागले आहे,


गॅस टेंपो वाहतुकीमुळे गॅस टाकी एमारपी रेट मधेच मिळत होती त्यामुळे लॉक डाऊन काळात गॅस टाकीवरील अतिरिक्त खर्च वाचत होता, आता गॅस टेंपो वाहतुकीस मुदत संपत असली तरी सद्या लॉक डाऊन ची परिस्थिती आजही असल्याने  गेस टेम्पो वाहतुकीस किमान 2 वर्षाची मुदत वाढ मिळावी  अशी आमची मागणी आहे 

सुनील शिंदें -- सामाजिक कार्यकर्ते


पूर्वी गेस टाकी  घोड्यावरून वाहतूक होत  असल्याने 150 ते 200 रु  जास्त द्यावे लागत होते कोरोना काळात गॅस टेम्पो वाहतूकस  परवानगी दिल्याने आम्हाला गॅस टाकी  मूळ किंमतीत  व वेळेत  मिळत होते, परंतु आता  30 सप्टेंबर पर्यंतच  गेस टेंपो वाहतुकीस परवानगी असल्याने पुन्हा गॅस टाक्या घोड्यावरून आणल्यास अतिरिक्त खर्च  वाढणार आहे, तरी सर्व गृहिणीच्या वतीने शासनाला  विनंती करतो की गॅस टेंपो  वाहतुकीस  मुदत वाढ द्यावी

राजश्री शैलेंद्र दळवी--गृहिणी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies