अव्वाच्या-सव्वा बिले; रुग्णांची लूट?
शिवसेना तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे
ओंकार रेळेकर-चिपळूण
कोरोना रुग्णांवर उपचाराच्या नावाखाली काही खाजगी डॉक्टर व काही खाजगी दवाखाने अव्वाच्या-सव्वा बिले रुग्णांवरती आकारुन त्यांची पिळवणूक करत आहेत. व तालुक्यातील काही रुग्णवाहिका मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये जाण्यासाठी अवास्तव भाड्याची मागणी करत आहेत. या विषयाला अनुसरून तालुका आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये तालुका प्रशासन आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी यांच्यासमोर हा विषय निदर्शनास आणून दिलेला आहे. माननीय आमदार श्री. भास्करराव जाधव, माननीय माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, प्रांत अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे डॉक्टर यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिलेल्या नंतर श्री भास्कर जाधव व श्री सदानंद चव्हाण यांनी व प्रशासनाने या संपूर्ण गोष्टीची येत्या दोन तीन दिवसात चौकशी करू. असे सांगितले आहे.
तरी तालुक्यातील व तालुका व्यतिरिक्त आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना विनंती आहे कि अशा तर्हेचे कोणत्याही खाजगी हॉस्पिटलकडून आपली उपचारादरम्यान पिळवणूक झाली असेल,दुर्लक्षित केला असेल, मानसिक त्रास दिला असेल, तर कृपा करून मी श्री.प्रताप गणपतराव शिंदे तालुका प्रमुख शिवसेना व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आपल्याला विनंती करतो की आपण आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, हॉस्पिटलचे नाव दिलेल्या बिलाची झेरॉक्स किंवा रक्कम आणि रुग्णालयातला कालावधी, रोगाचे नाव या सर्व कागदपत्रांची पूर्तता व्हाट्सअप द्वारे किंवा प्रत्यक्षरीत्या माझ्याकडे सुपूर्त करावी. आपण पाठिंबा दिलात तरच हे जनआंदोलन प्रभावी होईल.व ग्रामीण भागातल्या व शहरी भागातील गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यास मला व अशा आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल अशी माहिती चिपळूण शिवसेना तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली,