माथेरान मध्ये विविध कामांचे भूमिपूजन
चंद्रकांत सुतार--माथेरान
माथेरान नगरपरिषदेच्या वतीने गावात मुस्लिम मोहल्ला, कस्तुरबा रस्ताच्या विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते तर शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला यावेळी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांसह आजी माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अभियंता, कर्मचारी वर्ग, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रीती हॉटेल पासून ते हॉटेल पॅनोरमा पर्यंत क्ले पेव्हर ब्लॉक या रस्त्यासाठी ९८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून *रस्ता अनुदानातून* हे काम केले जात आहे तर, रेल्वे लाईन पासून मुस्लिम मोहल्ल्यातील भागात पावसाळी गटार करीता आठ लाख रुपये खर्च करून *नफा फंडातून* गटाराचे काम केले जाणार आहे आणि *स्वच्छ संरक्षण अंतर्गत माथेरानला 2.5 कोटी निधी प्राप्त झाला होता त्या निधीतून* मुस्लिम मोहल्ल्यात जुन्या शौचालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या जागेच्या सुशोभीकरणासाठी २३ लाख रुपयांची मोठी रक्कम खर्च करण्यात येणार आहे. चारी बाजूस कंपाउंड वॉल, पाथ वे, ओपन जिम साहित्य, व बसण्यास जागा असे कामाचे स्वरूप असेल या सर्व कामाचा भूमिपूजन कार्यक्रम विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
येणाऱ्या काळात मोठया प्रमाणावर विकास कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि लवकरच सर्व कामे मार्गी लागणार आहेत .दरम्यान ही सर्व विकास कामे पूर्ण करण्यासाठी मोठया प्रमाणावर रक्कम खर्च करण्यात येणार आहे त्यामुळे संबंधित परवानाधारक ठेकेदारांनी त्यांच्या मार्फत ही कामे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीनी निश्चित पणे या मोठया रक्कमेचा योग्य वापर करून ही कामे अधिक काळ तरी टिकतील जेणेकरून नगरपरिषदेच्या या रक्कमेचा अपव्यय होणार नाही अशाप्रकारे पूर्ण करावीत.
आमच्या प्रभागात ही विकास कामे सुरू केल्यामुळे निश्चितच हा भाग विकसित होणार आहे त्यासाठी आम्ही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,गटनेते प्रसाद सावंत आणि सर्व लोकप्रतिनिधीचे आभारी आहोत
स्थानिक रहिवासी अनिस शेख
कस्तुरबा रोडवरील पेनोरामा हॉटेल ते प्रिति हॉटेल पर्यंत चा धूळ विहरित रस्ता व्हावा ही आमची अनेक वर्षा पासून मागणी होत होती ती आता पूर्ण होत याचा आम्हा व्यापारी वर्गासाठी आनंदाची गोष्ट आहे .
सूर्यकांत कारंडे -स्थानिक दुकानदार