चिपळूण रोहिदास समाज सेवा संघाच्या मीटिंगमध्ये कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या समाज बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूण तालुका रोहिदास समाज सेवा संघाच्या कार्यकारिणी मिटींगमध्ये कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्यांमध्ये अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांच्यासह अन्य समाज बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर कोरोनाच्या संकटात जनसेवा करणाऱ्या समाजबांधवांचे गोड कौतुक करण्यात आले.
चिपळूण तालुका कोणता समाज सेवा संघाच्या कार्यकारिणीची नुकतीच मिटींग मार्कंडी येथील रोहिदास भवनमध्ये झाली. यावेळी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्यांमध्ये समाजाचे नेते सुरेश चिपळूणकर, सदस्य सुरेश सावर्डेकर, सुनील चिपळूणकर तसेच समाजबांधव सीताराम राणे, पी. बी. कदम व अन्य समाजबांधवांचा विष्णूपंत सावर्डेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच कोरोनाच्या संकटात समाजातील शासकीय-निमशासकीय बँक तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेने उत्कृष्टपणे जनसेवा केली. या सर्वांचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपात संतोष रिळकर, यशवंत पेढाबकर यांनी स्वीकारला. यावेळ कोणाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी जनजागृती करणे आवश्यक आहे असे आवाहन केले. या मिटिंगला उपाध्यक्ष मंगेश पेढाबकर, कार्याध्यक्ष अनिल चिपळूणकर, सहचिटणीस संदीप मुंढेकर, सुधीर जानवलकर, अंकुश चिपळूणकर, अजित आंबवकर, सुरेश सावर्डेकर, समीर जानवंलकर आदी उपस्थित होते. या मीटिंगचे सूत्रसंचालन सचिव प्रकाश पेढाबकर कर यांनी केले.