योगा शिबिराला चिपळूणमध्ये मोठा प्रतिसाद
ओंकार रेळेकर-चिपळूण
येथील एस.एम.जी फिटनेस हबच्या वतीने चिपळुणवासियांसाठी एक आठवडयाचे मोफत योगा शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंतरराश्ट्रीय स्तरावर तसेच अनेक सिने अभिनेत्यांचे जिम एक्सपर्ट असलेले मंगेश जाधव आणि योगा एक्सपर्ट शिल्पा जाधव यांनी या शिबिराचे आयोजन केले होते आणि त्यांनी स्वतः शिबिरार्थीना योगाचे मोफत प्रशिक्षणही दिले.
चिपळूण शहरातील हाॅटेल अतिथीच्या हाॅलमध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन श्री. कोकरे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, गौरव पाटेकर, राष्ट्रवादी विदयार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, आबा पवार, संतोष सकपाळ आदी व्यासपिठावर होते.
यावेळी बोलताना कोकरे महाराज यांनी आजच्या धकाधकीच्या युगात माणसाचं आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होवू लागलं आहे. त्याचे परिणाम वयाच्या पन्नाशीनंतर लक्षात येतात. परंतु, शरीर फिट राहण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन कामातून रोज थोडावेळ काढणे हे खूपच गरजेचे आहे. योगा तसेच व्यायामामुळे ताणतणावापासून मुक्तता होते आणि माणूस दिवसभर उत्साही राहतो. सध्या कोरोनाच्या काळात तर आपली प्रतिकारशक्ती चांगली असायला हवी आणि ती टिकविण्याचे काम व्यायामाने साध्य होते, असे सांगून शिल्पा जाधव व मंगेश जाधव यांनी योग्य वेळी हे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमामध्ये शिल्पा जाधव यांनी निरोगी राहण्यासाठी काय करणे आणि काय टाळणे गरजेचे आहे हे अगदी छोटया छोटया उदाहरणे सांगून पटवून दिले. आपली जीवनषैली कशी असावी, दिनक्रम कसा असावा, आपण आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे इथपासून तणावमुक्त जगण्यासाठी योगा किती महत्वाचा आहे, याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले. त्यांनी केलेल्या मार्गदर्षनाने सर्वांनाच आपली सध्याची जीवनशैली कषी आहे आणि आपण त्यात काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याची उत्तम अशी माहिती प्राप्त झाली.
या कार्यक्रमामध्ये हजारो कोरोना रूग्णांना आयुर्वेदिक औषधाने बऱ्या करणाऱ्याला अनुपमा कदम यांचा विशेष गौरव करण्यात आला. स्वतः कोकरे महाराज यांनी माझी पत्नी व आपण स्वतः त्यांचे औषध घेवूनच बरे झाल्याचा उल्लेख करून गौरवोदगार काढले सतीश मोरे यांनीही कदम यांच्या आयुर्वेदिक औषधांचा प्रसार अजून सर्वत्र झाला पाहिजे, असे उद्गार काढले. योगेश शिर्के यांच्यासह अन्य मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली.
उद्घाटनानंतर दि. 21 ते 27 सप्टेंबर या कालावधीमध्ये जिम एक्सपर्ट श्री. मंगेश जाधव आणि योगा एक्सपर्ट शिल्पा जाधव यांनी नागरिकांसाठी मोफत योगा शिबिर घेतले. या शिबिरातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. त्याचा फायदा आम्हाला भविष्यात नक्कीच होईल, अशी प्रतिक्रिया देवून शिबिरार्थींनी दोन्ही एक्सपर्टचे आभार मानले.