माणगाव बसस्थानकात खड्डे .....
संतोष सुतार-माणगांव
अर्ध्या वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर आता लालपरी नेहमी प्रमाणे धावू लागली आहे. अशा वेळी माणगांव राज्य परिवहन महामंडळ बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य पुन्हा पसरायला सुरुवात झाली आहे. आधीच कोरोना संकटाने हैराण, त्यात वेळीच हे खड्डे भरले नाही तर प्रवाशांना भोवणार आहे. कारण बस स्थानकात शिरताना साचलेले पाणी अंगावर उडते, ते चुकविताना प्रवाशांची तारांबळ उडते. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर भरावेत प्रवाशांकडून मागणी होत आहे.