देशात आणि राज्यात विविध ठिकाणी अनुपमा कदम यांच्या आयुर्वेदिक औषधाची मोठी मागणी
अठराशे कोरोना रुणांवर आपले आयुर्वेद यशस्वी ठरल्याचा कदम यांचा दावा
डी फार्मा प्रयोगशाळेच्या मान्यतेनंतर औषध निर्मितीला मिळत आहे अधिक गती
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूण मधील लोकप्रिय आयुर्वेद तज्ञ अनुपमा कदम यांनी तेरा वर्षाच्या आयुर्वेदाच्या अभ्यासाच्या जोरावर निर्माण केलेल्या कोरोना आजारावरील औषधाला दिवसेंदिवस देशात आणि राज्यात विविध ठिकाणी मागणी वाढत असून आतापर्यंत सुमारे अठराशे कोरोना रुग्णावर यशस्वी उपचार केले असल्याची माहिती आयुर्वेद तज्ञ अनुपमा अमोल कदम यांनी दिली,महाराष्ट्र सरकारच्या डी फार्मा प्रयोगशाळेची याला नुकतीच परवानगी मिळाली असल्याचे कदम यांनी सांगितले,
अनुपमा कदम यांनी मागील अनेकवर्षं आयुर्वेदात केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून दमा,न्यूमोनिया, किडनी स्टोन, उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, ब्लॉकेजेस,कोलेस्ट्रॉल ,वारंवार अशक्तपणा इत्यादी असंख्य गंभीर रोगांवर उपचार केले आहेत,कोरोना रोगाचा वाढता संसर्ग पाहता या आजारावर आपण गुणकारी औषधाची निर्मिती करण्याचा मनाशी निश्चय केला असे कदम म्हणाल्या.
त्यानुसार त्यांनी चिपळूण तालुक्यातील सावर्डे, नांदिवसे आदी ग्रामीण भागाप्रमाणेच महाराष्ट्रा तसेच अन्य तमिळनाडू, हुबळी ओडिसा, कर्नाटक, बेंगलोर ईत्यादी राज्यांमध्ये कोरोना रुग्णांना औषध उपलब्ध करून दिले यातून आज पर्यंत सुमारे अठराशे रुग्ण ठणठणीत बरे झाले असल्याचे अनुपमा कदम यांनी सांगितले.
गोव्याचे मॅजिस्ट्रेट दिपेश धुरी यांना या औषधाचा गुण आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष भेटून अनुपमा कदम यांना धन्यवाद दिले,अत्यल्प दरात उपलब्ध असलेले हे औषध घेऊन नक्कीच कोरोना पासून मुक्ती मिळते असा दावा करून कोरोना आजाराला घाबरू नये असे आवाहन अनुपमा कदम यांनी केले आहे,