वातावरण ढगाळ ,पाराही उतरला ,पावसाची रिपरिप, नाचणी वरी पिकांना धोका !
संतोष सुतार-माणगांव
माणगांव मध्ये गेले काही दिवस वातावरण ढगाळ झाले असून पावसाची रिप रिप सुरू झाली आहे. गेल्या काही दिवस जाणवणारा उकाडा गायब झाला आहे.या वातावरणाचा नाचणी,वरी या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसात जाणवणारा उकाडा अचानक गायब झाला असून पावसाची रिपरिप व पाराही काही अंशी घसरला आहे.ऑक्टोबर महिना जवळ आल्यामुळे वातावरणात गेल्या काही दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत होता.मात्र गेल्या दोन दिवसांपासून हवेतील उकाडा गायब झाला असून वातावरण ढगाळ ,पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. या काळात नाचणी, वरी सारखी पिकं बहरात येतात.त्यांना चांगल्या उन्हाची आवश्यकता असते मात्र गेल्या काही दिवसांत हवामान ढगाळ व पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नाचणी वरीच्या पिकांचे नुकसान होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला उकाडा कमी झाला असला तरी हवेतील ढगाळ पणामुळे वातावरनात किंचित गारवा जाणवत आहे.
ढगाळ हवामान नाचणी, वरी सारख्या पिकांसाठी योग्य नाही.या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर पीक चांगले येते .ढगाळ हवेमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
गणपत कालप,बुजुर्ग शेतकरी.