BSNL कार्यालयावर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धडक
ओंकार रेळेकर-चिपळूण
BSNL नेटवर्क कमतरतेमुळे चिपळूण तालुका व इतर परिसरातील लोकांना गेले अनेक दिवस नाहक त्रास सहन करावा लागत आहे यासंबंधीची पूर्वकल्पना वारंवार संबंधित BSNL प्रशासनाला देऊन सुद्दा कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्ह्याद्यक्ष योगेश शिर्के यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत BSNL कार्यालयाला आज भेट दिली आणि ग्रामीण व शहरी भागातील ग्रामस्थांच्या तक्रारी तसेच सध्या online शिक्षण पद्धतीवर होणाऱ्या वाईट परिणामांची कल्पना दिली व लवकरात लवकर योग्य दि उपाय योजना करण्यासाठी संबंधीत प्रशासनाला ठणकावून सांगितले .
यावेळी योगेश शिर्के यांच्या सोबत माजी नगरसेवक मनोज जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदें, अल्पसंख्याक उपाध्यक्ष इकबाल मुल्ला,विद्यार्थी तालुकाध्यक्ष वात्सल्य शिंदे, युवानेते सचिन पाटेकर, युवक उपाध्यक्ष उदय भोजने, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष ऋतुजा चौगुले , सोशल मीडिया अध्यक्ष अक्षय केदारी, युवक सरचिटणीस तुषार गमरे, खालिद पटाईत, जान्हवी फोडकर, प्रणिता घाडगे, अनन्या शिंदे, श्रुतिक पालांडे, ओंकार खेडेकर, किरण फागे, शैबाज कटमाले आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते