पुणे-बंगलोर महामार्गावर विचित्र अपघात,15 गाड्यांचे नुकसान तर एक जण ठार व 10 ते 12 जण जखमी
Team Maharashtra Mirror10/06/2020 06:38:00 AM
0
पुणे-बंगलोर महामार्गावर विचित्र अपघात,15 गाड्यांचे नुकसान तर एक जण ठार व 10 ते 12 जण जखमी
सुरेश अंबुरे-पुणे
पुणे बंगलोर महामार्गावर आज एक मालवाहू ट्रकने 10 ते 15 वाहनांना दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर 10 ते 12 जण जखमी झाले असून इतर गाड्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले आहे.या विचित्र अपघातात भरधाव असणाऱ्या मालवाहू ट्रकने एक जण जागीच चिरडला गेला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.