सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पराक्रमाची साक्ष असलेला प्रतापगड किल्ला 360 मशाली नि उजळून निघाला या गडावरील भवानीमातेच्या मंदीराला 360 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव साजरा करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेले पराक्रम हे या किल्ल्याशी जोडले गेले आहेत शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्रामi दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून 1661 सालि प्रताप गडावर तिची स्थापना केली होती या घटनेला 360 वर्षे पूर्ण झाली असून प्रत्येक वर्षी या मशाली इत एक ने वाढ होती या वर्षी 360 मशालीने किल्ला तेजोमय झाला होता दरवर्षी हजारो शिवप्रेमी या गडावर उपस्थित असतात पण कोरोना महामारी ज्या पार्श्वभूमीवर अगदी थोडक्याच शिवप्रेमींच्या उपस्थित अगदी साधेपणाने योग्य ते सोशल डिस्टंसिंग पाळून हा सोहळा संपन्न झाला यावेळी शिवप्रेमींनी जगावर आलेले कोरोना रुपी संकट टळू दे असे साकडे भवानी मातेला घातले भवानी मातेची विधिवत पूजा झाल्यानंतर जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या या मशालींच्या प्रकाशामुळे गड परिसर उजळून निघाला गडावरील हा नयनरम्य नजराना उपस्थित शिवप्रेमींनी डोळ्यात अगदी साठवून ठेवला प्रतापगड किल्ल्याच्या भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशाल इं मुळे गड अक्षरशा प्रकाश मय झालेला होता या नयनरम्य नजराना मुळे जनु शिव काळच अवतरला असण्याचा भास होत होता निश्चितच सह्याद्री डोंगररांगांमध्ये असलेला प्रतापगड किल्ला हा अनेक शिवकालीन ऐतिहासिक घटनांची साक्ष देतोय