महाराष्ट्रात सरसकट ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रूपये तात्काळ नुकसान भरपाई द्यावी -श्रेयश नाईक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची मागणी
निवास पाटील-आटपाडी
महाराष्ट्र राज्यभर अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतमालाचे खुप नुकसान झाले आहे. त्यामधून शेतीसाठी केलेल्या मेहनतीचे पैसे सुद्धा त्याला मिळणार नाही ही आजची वास्तव परिस्थिती आहे. आजची परिस्थिती खुप गंभीर आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता सरासरी 70% पिकाचे नुकसान झाले आहे. अशा नैसर्गिक संकट काळात प्रशासनाकडून महाराष्ट्रात सरसकट ओला दुष्काळ जाहिर करून कुठल्या पंचनाम्यात वेळ न घालवता शेतकऱ्याला विना विलंब त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत थेट शेतकऱ्याच्या बँक अकॉउंट वर जमा करण्यात यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्याचा इशारा श्रेयस नाईक यांनी दिला. आंदोलनावेळी होणार्या मानसिक आणि आर्थिक नुकसानीस आणि असुविधेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.असेही नाईक यांनी निवेदनात नमूद केलं आहे.
तरी या संकटसमयी प्रशासनाने भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असलेल्या व सगळ्या इंडस्ट्रीज बंद होत्या तेंव्हा माझ्या शेतक-याची एकच शेती इंडस्ट्री सुरु होती.त्यामुळेच तुम्ही जगला !
आज त्याच इंडस्ट्रीला हात-भार लावण्याची गरज आहे.
श्रमकरी,शेतकरी वर्गाला आर्थिक मदतीचा हात देण्यात यावा. व कोरोनामुळे देश व ओल्या दुष्काळा मुळे शेतकरी हवालदील झालाय लॉकडाउन मध्ये व्याजाने पैसे काढून पिकं जगवलेला शेतकरी संपलाय. हे एकट्या शेतकऱ्यांचे नुकसान नाही. शेतकऱ्यांचा पैसा टाटा पासून महिंद्रा पर्यंत फिरतो आणि त्यातून नोकरशाही ते मार्केट
हा शेतकरी संपन तुमचं नुकसान आहे!
शेतकर्यांच्या व्यथा मांडून त्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत देण्यासंदर्भात तसे निवेदन मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांना ईमेलद्वारे संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी दिले आहे.