गुहागर ; नीट परीक्षेत श्रेयश भाले याने 690 गुण मिळवले
ओंकार रेळेकर-चिपळूण
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात गुहागर येथील श्रेयश सुरेश भाले 720 पैकी 690 गुण मिळवले. व देशात 249 क्रमांक मध्ये आला आहे. 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
देशभरातून सुमारे 15 लाख 97 हजार 435 विद्यार्थ्यांना ही परीक्षा दिली. श्रेयश भाले हा गुहागर येथील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांचा सुपुत्र आहे श्रेयश भाले याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.