Apl रेशन मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी घेतली जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट
ऑक्टोबर अखेर सर्व नागरिकांना धान्य मिळेल,पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली गाव विकास समितीला माहिती
ओंकार रेळेकर-चिपळूण
रत्नागिरी जिल्ह्यात काही Apl रेशन धारकांना ऑगस्ट महिन्यापासुन धान्य मिळाले नाही. ग्राहकांनी रेशन दुकानदाराकडे चौकशी केली असता दुकानदाराने नीट उत्तरे दिली नाही. त्यामुळे ग्राहकांत गोंधळ निर्माण झाला. काही ग्राहकांना धान्य मिळाले तर काहींना नाही. ऑनलाईन तक्रार करुन ही निवारण झाले नाही. शेवटी ग्राहकांनी गाव विकास समितीकडे आपली समस्या मांडली. संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी त्वरीत जिल्हा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ग्राहकांना होणारा त्रास, ग्राहकांच्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. ग्राहकांना नेमके रेशन का मिळत नाही? अर्ध्यांना मिळाले तर बाकीच्यांचे काय? त्यांनी कधी मिळणार? याची उत्तरे जाणुन घेतली. त्याच बरोबर काझी यांनी रेशन दुकानदार ग्राहकांना कसे संभ्रमित करतात याची ही कल्पना अधिकाऱ्यांना दिली. रत्नागिरी जिल्ह्यात पुरेसा धान्य साठा उपलब्ध नसल्याने ग्राहकांना धान्य देण्यात येत नाही आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवट पर्यंत सर्वांना धान्य मिळेल व तशी माहीती ही ग्राहकांना देऊ असे अधिकाऱ्यांनी गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझमील काझी यांना सांगितले.जो पर्यंत नागरिकांना उर्वरित धान्य प्रत्यक्ष मिळत नाही तोपर्यंत गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या माध्यमातून या विषयाचा पाठपुरावा केला जाईल असे यावेळी संघटनेने स्पष्ट केले आहे.