खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान व पिक विमा त्वरित त्वरीत द्यावा...
राणाजगजितसिंह पाटील यांची कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे मागणी
राम जळकोटे-उस्मानाबाद
गेल्या कांही दिवसात झालेल्या अतीवृष्टी मुळे उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप पिकाचे व ऊसाचे देखील मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. प्राथमीक अंदाजाप्रमाणे ७० % क्षेत्रावरील सोयाबीन तसेच इतर पिकांचे व उसाचे क्षेत्र बाधीत झाले आहे. झालेल्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेवून शेतक-यांना दस-याच्या अगोदर अनुदान व पिक विमा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आ.राणाजगजितसिह पाटील यांच्या पत्रासह कृषी मंत्री ना.दादासाहेब भुसे यांच्याकडे केली.
तुळजापूर येथे आपण जिल्हास्तरीय आढावा बैठक ठेवली होती. परंतू ऐनवेळी ती रदद करण्यात आली. वस्तु: आपण लातूरहून सोलापूरला जाताना उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आढावा बैठक घेतली असती तर नुकसानीची तीव्रता व विषयाचे गांर्भीय आपल्याला समजले असते. त्याच बरोबर जिल्ह्यातील शेतकर्यांना देखील थोडा फार दिलासा वाटला असता.कोवीड.१९ च्या प्रादुर्भार्वामुळे अभूतपूर्व अडचणीत असलेली अर्थ व्यवस्था व त्यात बळीराजावर झालेला हा मोठा आघात लक्षात घेता शासनाकडून तातडीने खालील उपाययोजना राबविण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
१. अनुदान :- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ३३% पेक्षा जास्त क्षेत्र बाधीत झालेले आहे. हे लक्षात घेता NDRF /SDRF च्या स्थायी आदेशाप्रमाणे पिकांना हेक्टरी रू. ६८००, १३५०० मदत करणे अनुज्ञेय आहे. मदत शेतकऱ्यांना विना विलंब मिळावी यासाठी कालबध्द कृती आराखडा करण्यात यावा व त्याच्या अंमलबजावणी बाबत संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांना कडक सुचना देण्यात याव्यात.
२. सर्वसाधारण पिक विम्याची नुकसान भरपाई देण्यासाठीच्या प्रचलीत पध्दतीनुसार खरीप पिकांचे कापणी प्रयोग सुरु आहेत. त्या बाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याबाबत कालमर्यादा आखुन देण्यात यावी व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधीताना देण्यात यावेत.
३. अनेक शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जे की प्रात्यक्षीक पिक कापनी प्रयोगाच्या कार्यपध्दतीनुसार लक्षात येणे शक्य नाही. अशा शेतकऱ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे मंडळनिहाय नुकसान भरपाई दिली जाते व अन्याय होवू नये म्हणून त्यांना वैयक्तीक अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अँपवर अर्ज केलेले आहेत व त्यातील अनेकांचे वैयक्तीक पंचनामे करण्यात आले आहेत. मोठ्याप्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वस्तुनीष्ट नुकसान भरपाई मिळावी या अनुषंगाने वस्तुनिष्ठ देण्यासाठी काल मर्यादा ठरवावी.
४ अनुदान देण्यासाठी तसेच पीक विम्याची नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारच्या हिस्यासोबत राज्य सरकारचा हिस्सा देखील आवश्यक असतो, याची आपणांस कल्पना आहे. तरी
राज्य सरकारच्या हिस्याचा अंदाज घेवून त्याची तातडीने आर्थिक तरतुद करण्यात यावी, जेणे करुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्वरीत प्रत्यक्षात रक्कम विनाविलंब अदा करणे शक्य होईल.उस्मानाबाद जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिलेले आहे. या अभूतपूर्व अडचणीच्या काळात बळीराजाला अनुदान व पिक विम्याची रक्कम घट स्थापनेच्या पूर्वी म्हणजे १७/१०/२०२० पर्यंत खात्यावर मिळावी ही जिल्ह्यातील शेतकर्यांच्या वतीने आग्रही मागणी मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.अनिल काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, जिल्हा मजुर फेडरेशनचे माजी अध्यक्ष नारायण नन्नवरे, पं.स.उपसभापती शिवाजी गोरे, अनिल बंडगर, नानासाहेब डोंगरे, सुहास साळुंके, सुशांत भुमकर, गिरीष देवळाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.