बार्शी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मरगळ झटकणार का?
बार्शी -
बार्शी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक होता माजी आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मरगळ दिसून येत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आलेली मरगळ झटकणार कधी? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सावळे सभागृह पुरता मर्यादित आहे की काय ? अशी चर्चा बार्शी तालुक्यामध्ये सुरू आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असताना सुद्धा राष्ट्रवादीचे नेते हे तालुक्याकडे लक्ष देताना दिसून येत नाहीत सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे मंत्री असताना सुद्धा बार्शी दौरा करणे आवश्यक असताना त्यांनी तो दौरा केला नाही त्यामुळे दत्ता भरणे यांच्यावर सुद्धा बार्शीकर नाराज आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नवीन चेहरे दिले गेले पाहिजेत अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे .
माजी आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेले परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बार्शी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हे दिलीप सोपल यांना जवळ करत आहे की ?काय असा प्रश्न निर्माण होत आहे .बार्शी नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना सुद्धा राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी किंवा विविध उपक्रम करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही बार्शी मध्ये अवकाळी पाऊस कोरोनांची परिस्थिती असताना सुद्धा राष्ट्रवादी पदाधिकारी आपल्या घरातूनच कारभार करत आहेत की काय असा प्रश्न सध्या बार्शी तालुक्यात विचारला जात आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आता तरी लक्ष्य देणार आहेत की नाही असा प्रश्न पडला आहे.