Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

फॅन थ्रोटेड लिझर्ड" ही साताऱ्यातील पाल चालतेय आंतरराष्ट्रीय स्तरावर

फॅन थ्रोटेड लिझर्ड" ही साताऱ्यातील पाल चालतेय आंतरराष्ट्रीय स्तरावर


 कुलदीप मोहिते-

 महाराष्ट्र मिरर टीम सातारा




 सतराव्या शतकात साताऱ्याची ओळख मराठा साम्राज्याची राजधानी अशी होती. त्यानंतरच्या काळात पेन्शनर्सचे गाव अशीही ओळख निर्माण झाली. निसर्गाची कृपा असणाऱ्या साताऱ्याची ओळख कालांतराने आजूबाजूला असणाऱ्या कास पठार, वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा व पश्चिम घाट परिसरात वसलेल्या ठिकाणांमुळे एक निसर्गरम्य ठिकाण अशी होऊ लागली. पश्चिम घाट परिसरातील साप, सरडा, पाली अश्या अनेक प्रकारच्या जैवविविधतेवर बऱ्याच लोकांनी संशोधन केले. 



 

काही सन्माननीय अपवाद वगळता हे संशोधन सामान्य लोकांपर्यंत पोचू शकले नाही. धीरज झंवर आणि स्थानिक संशोधक असे सर्व जण एक फिल्म बनवत आहोत की ज्यामुळे हे सर्व संशोधन सातारकर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व लोकांपर्यंत पोचू शकेल. ज्यामुळे साताऱ्याचे नाव आणखीनच उज्ज्वल होईल. फॅन थ्रोटेड लिझर्ड ही चाळकेवाडी परिसरात आढळणारी पालीची एक प्रजाती आहे. 




त्याच्या पूर्ण जीवनचक्राचा अभ्यास करून त्यावर एक छोटी फिल्म बनवली आहे. ह्या फिल्म ला अंतराराष्टीय स्तरावर Nature in focus Film Festival 2020-Emerging Talent Category एक पुरस्कार ही मिळाला आहे. ह्यामुळे साताऱ्याचे नाव नक्कीच अंतराराष्टीय स्तरावर पोचले आहे ह्या संशोधनादरम्यान काही पर्यावरणाला हानी पोचेल असे प्लस्टिक, जीवांना इजा होईल असे ग्लासचे तुकडे, तसेच लागणारे वणवे असे काही प्रॉब्लेम दिसले. त्यामुळे पर्यावरणचा समतोल राखण्यासाठीही आम्ही लोकांचे प्रबोधन करण्याचे काम करत आहोत. ही फिल्म बघण्यासाठी Wildeyes films या युट्युब चॅनेलवर बघू शकता असे धीरज झंवरने सांगीतले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies