Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अतिवृष्टीने वाहुन गेलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा : राज्यमंत्री डॉ . विश्वजीत कदम

 अतिवृष्टीने वाहुन गेलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा : राज्यमंत्री डॉ . विश्वजीत कदम 

बांधकाम व महसूल विभागास दिले आदेश 

उमेश पाटील -सांगली 


भिलवडी ( ता. पलूस ) खंडोबाचीवाडी ते धनगांव ग्रामीण मार्गाचा रस्ता अतिवृष्टीने वाहुन गेला होता . यामुळे या रस्त्याची वाहतुक बंद होती . या रस्त्याची पाहणी कृषी राज्यमंत्री डॉ . विश्वजीत कदम यांनी केली .व महसूल व बांधकाम विभागास हा रस्ता तात्काळ आपत्ती निधीतुन भराव टाकून वाहतुकीस तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले . तर पुढील काही दिवसात हा तुटलेला रस्ता कोणत्याही निधीत बसवून पक्का केला जाईल असे मत मंत्री डॉ . कदम यांनी व्यक्त केले . याच बरोबर अंकलखोप - औदुंबर _आमणापूर . या भागांतील रस्तेही अतिवृष्टीने निकामी झाले आहेत . या रस्त्यांची दुरुस्तीची मागणी होत आहे . तर माळवाडी भटकी रस्ता ते गारपीर जवळील रस्ता पुर्ण खचून एका बाजूने निकामी झाला आहे . तर खटाव बंधारयालगतचा रस्ताही निकामी होऊन एका बाजूने तुटला आहे . या रसस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आशी मागणी खटावचे नेते ओंकार पाटील यांनी राज्यमंत्री डॉ . विश्वजीत कदम यांच्याकडे केली . कृष्णाकाठावरील अतिवृष्टीने खचलेल्या व तुटलेल्या रस्त्यांचा आढावा घेऊन तात्काळ रस्ते दुरुस्त केले जातील असे आश्वासन मंत्री डॉ . कदम यांनी दिले .

यावेळी राज्यमंत्री डॉ . विश्वजीत कदम यांच्या सोबत  तहसिलदार सचिन ढाणे व महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies