ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीत जास्त भाव देणार - ॲड. व्यंकटराव गुंड
राम जळकोटे-उस्मानाबाद
गतवर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्य कारखान्यापेक्षा रुपामाता नॅचरल कारखान्याने दहा दिवसात एक रक्कमी प्रति टनास अडीच हजार रुपये इतका भाव दिला असल्याचे सांगून सर्व ऊस उत्पादकाना परिसरातील इतर कारखान्यापेक्षा जास्त भाव देण्याचे रुपामाता नॅचरल शुगर कारखान्याचे चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड यांनी जाहीर करुन कारखान्याचा चालू हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कर्मचा-यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पाडोळी (आ) ता. उस्मानाबाद येथील रुपामाता नॅचरल शुगर कारखान्याच्या १००० टीसीडी इतक्या क्षमतेच्या गुळ पावडर उत्पादित करणाऱ्या कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्रम दि. 30 सप्टेंबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी चेअरमन गुंड हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंडे हे होते. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, पाडोळी (आ) च्या सरपंच सौ. कौशल्याबाई सुधाकर गुंड, उपसरपंच बाबुराव पुजारी, कारखान्याचे व्हाईस चेअरमन एम.के. सुर्यवंशी, अॅड. अजितकुमार गुंड , कारखान्याचे चीफ इंजिनिअर सहदेव खोचरे, चीफ केमिस्ट नारायण निरफळ, शेतकी अधिकारी पाटील, सुरक्षा अधिकारी लिंबराज मसे, असिस्टंट इंजिनिअर संजय गुंड , विशाल सुर्यवंशी , विशाल चव्हाण , पाडोळी सोसायटीचे संचालक रामदासअप्पा गुंड , अमोल काळे, माणिक चव्हाण, शाहुराज गुंड, हरिदास गुंड यांच्यासह ऊसउत्पातादक शेतकरी व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. शरद गुंड यांनी केले. तर बाबुराव पुजारी यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.