किलज येथील कुटुंबांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली मदत.
राम जळकोटे-तुळजापूर
दि.१३ व १४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे किलज मधील अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे.यात नदीलगतच्या कुटुंबाला मोठा फटका बसला आहे. त्यांची घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.याची काळजी घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आर्थिक मदत केली आहे.यामध्ये आपत्तीग्रस्त १३ कुटुंबाना दि.१८ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी १०,००० रु मदत करण्यात आली. आपण खचून जाऊ नका तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगण्यात आले. माजी सभापती जिल्हा उपाध्यक्ष दिपक दादा आलुरे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह जी देशमुख साहेब,तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे ,नारायण भाऊ नन्नवरे,माजी जिप सदस्य वसंतराव दादा वडगावे ,उपसभापती शिवाजी गोरे,प.स.सदस्य सिध्देश्वर आण्णा कोरे,भिवाजी इंगोलें दयानंद मुडके सह आदी मान्यवर तर गावातील वैजिनाथ कोनाळे, दिनकर पाटील, बालाजी शिंदे, प्रल्हाद सगर, दगडू शिंदे,विठल मरडे,महादेव पाटील,नामदेव शिंदे,सह आदी गावातील मंडळी उपस्थित होती.