आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला मेडिकल किट चे वाटप
प्रतिक मिसाळ -सातारा
सातारा:कोरेगाव विधानपरिषद चे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला व्हिटॅमिन सी च्या एक लाख गोळ्या , व्हिटॅमिन डी प्लस झिंक च्या एक लाख गोळ्या पाच हजार मास्क १०० कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर चे वाटप करण्यात आले . हे सर्व साहित्य सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांच्या कडे सुपूर्द केले .
यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी आमदार शिंदे यांनावाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . सातारा जिल्ह्यात मार्चपासून कोव्हीड -१ ९ मुळे पोलीस प्रशासनावर खूप मोठा ताण आला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलीस दलातील सैनिक लॉकडाऊन मध्ये कार्यरत आहेत . हे कोरोना योद्धे दिवसरात्र काम करत आहेत . त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्वांचा मी आणि सर्व सातारकर ऋणी आहे . ड्युटी करत असताना कोरोना पासून दूर राहण्यासाठी ही छोटीशी मदत आज वाढदिवसानिमित्त केली . असे आमदार शिंदे म्हणाले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री गोरखनाथ नलावडे, पंकज मिसाळ,ऍड सागर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.