बापुजी व शास्त्रीजी!
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
भारतमातेचे दोन सुपुत्र - राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा आज जन्मदिन. त्यांच्या ओजस्वी स्मृतींना श्रद्धांजली!
भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सात्विक व नैतिक बळ मिळवून देण्याचे कार्य बापुजींनी केले, तर शास्त्रींनी मंत्रिपदाला सेवा व साधेपण व प्रामाणिकपणाची जोड मिळवून दिली.
महात्माजींनी 'चले जाव'चा इशारा इंग्रजांना दिला, तर शास्त्रींनी 'जय जवान जय किसान'ची घोषणा देऊन भारतीयांना जागरुक केले.
अशा दोन्ही महापुरुषांच्या किती तरी आठवणी. त्यांची सेवा व त्याग यामुळेच भारताला चांगले दिवस दिसत आहेत.
त्यांना पुन्हा प्रणाम!