रायगडात परतीच्या पावसाचे थैमान, वीज पडून एक कामगाराचा मृत्यू
महाराष्ट्र मिरर टीम रायगड
नागोठण्यात वीज पडून आदिवासी तरुणाचा मृत्यू
नागोठणे परिसर गुरुवारी (दि.२२) सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान ढगाचा व वीजांचा गडगटाने दणाणून गेला असतानांच नागोठणे मोहल्ल्यात बांधकाम ठेकेदाराकडे काम करत असलेला एका तरुणावर वीज कोसळल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कातळावाडी या आदिवासी वाडीवरील रहिवासी वामन बाळू शिद ( वय३७) हा तरुण नागोठणे येथील एका बांधकाम ठेकेदाराकडे मजुरीने कामास जात होता. आज तो नागोठणे मोहल्ल्यात एका ठिकाणी बांधकाम काम करण्यासाठी गेला होता. सायंकाळी वीजा चमकत असताना तो आपला मोबाईलवर गाणी ऐकत असताना अचानक त्याच्या मोबाईलवर वीज पडली. त्यामुळे वामनला जोराचा शॉक बसला.
त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्याला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ आणले. परंतु वामन मृत झाला असल्याचे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कोळी यांनी सांगितले. दरम्यान ढगात वीजांचा गडगडाट होऊन वीजा चमकत असतील तर कुणीही आपला मोबाईल ऑन ठेऊ नका तात्काळ बंद करा असे आवाहन यावेळी डॉ. श्रीमती स्नेहल कोळी यांनी केले आहे.